Padma Awards 2023 : झाडीपट्टी रंगभूमीचे परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर | पुढारी

Padma Awards 2023 : झाडीपट्टी रंगभूमीचे परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ७४ व्या प्रजासत्ताक दिनापूर्वी, केंद्र सरकारकडून बुधवारी (दि. २५) भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार व प्रतिष्ठित पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील झाडीपट्टी रंगभुमीचे डॉ. परशुराम खुणे यांना पद्मश्री परस्कार जाहीर करण्यात आला आहे. ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण, ९१ पद्मश्री अशा एकूण १०६ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

कुरखेडा तालुक्याच्या गुरनुली गावातील डॉ. परशुराम खुणे गेल्या ४० वर्षांपासून झाडीपट्टीच्या रंगभूमीवर रसिकप्रिय विनोदी नट आहेत. आजपर्यंत झाडीपट्टीच्या रंगभूमीवर आठशेवर नाटकातून विविध भूमिका साकारल्या आहेत. विशेषत: ‘झाडीपट्टीतील दादा कोंडके’ अशीही त्यांची ख्याती आहे. डॉ. खुणे हे अनेक वर्षे गुरनुलीचे सरपंच होते. तसेच ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button