Fukrey ३ : पुलकित सम्राट- ऋचा चड्ढाचा फुकरे ३ 'या' दिवशी येणार | पुढारी

Fukrey ३ : पुलकित सम्राट- ऋचा चड्ढाचा फुकरे ३ 'या' दिवशी येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुकरे ३’ आजही चर्चेत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागासह दुसरा भागदेखील चाहत्यांना पसंतीस उतरला आहे. यादरम्यान मृगदीप सिंग लांबा हे या चित्रपटाचा तिसरा भाग कधी घेवून येणार यांची चाहत्यांना उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता चाहत्याची प्रतिक्षा संपली असून ‘फुकरे ३’ ( Fukrey ३ ) चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आला आहे. या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट, वरुण शर्मा, ऋचा चड्ढा, मनजोत सिंह आणि पंकज त्रिपाठी हे कलाकार दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर झाले आहे.

विरल भयानी याच्या इंन्स्टाग्रामवर आगामी ‘फुकरे ३’ ( Fukrey ३ ) चित्रपटातील दोन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. यातील पहिल्या पोस्टरमध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंह आणि पंकज त्रिपाठी हे चौघेजण एकमेंकाच्या खांद्यावर बसलेले दिसतात. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये या चौघांसोबत बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढादेखील दिसते. तर यात तिघांच्या गळ्यात आणि दोगांच्या हातात झेंडूच्या फुलांच्या वरमाळा दिसत आहेत.

Image

या पोस्टरच्या कॅप्शनमधून बहुप्रतीक्षित आणि यशस्वी कॉमेडी फ्रँचायझी ‘फुकरे ३’ चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे, ७ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे. यामुळे चाहत्यांच्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाची रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सल इंटरटेन्मेंटच्या अंतर्गत निर्मिती केली आहे. चित्रपटाचा पहिला भाग २०१३ मध्ये रिलीज झाला होता. ज्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे. यानंतर दुसरा भाग रिलीज करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button