Bholaa : 'एक चट्टान और सौ शैतान...'; अजयच्या 'भोला'चा दुसरा टीझर रिलीज | पुढारी

Bholaa : 'एक चट्टान और सौ शैतान...'; अजयच्या 'भोला'चा दुसरा टीझर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांचा आगामी ‘भोला’ ( Bholaa ) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला होता. यानंतर नुकताच या चित्रपटाचा दुसरा टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

अभिनेता अजय देवगणने त्याच्या इंन्स्टाग्रामवर आगामी ‘भोला’ (Bholaa) चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज केला आहे. २ मिनिटांच्या टिझरमध्ये अजयचे धमाकेदार अॅक्शन सीन पाहायला मिळत आहेत. या टीझरमध्ये पहिल्यांदा अजय देवगण आणि चिलिम ओढणारी व्यक्ती दिसतेय. यानंतर मोठे शहर, समुद्र, जाळपोळ, अॅक्शन सीन, आगीच्या मोठमोठ्या ज्वाला दिसतात. यात अभिनेत्री तब्बू एका पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. यात टीझरमध्ये खास करून ‘एक चट्टान और सौ शैतान…’ असे अक्षरात शब्द लिहिले आहेत.

या टीझरच्या कॅप्शनमध्ये अजयने लिहिले आहे की, ‘Jab ek chattaan, sau shaitaanon se takrayega…,#BholaaTeaser2 Out Now.’ याआधी गेल्या वर्षी २२ नोव्हेंबरला अजयच्या भोला चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा दुसरा टीझर चाहत्याच्या भेटीस आणला आहे. अजयचा हा टिझर चाहत्याच्या पंसतीस उतरला आहे.

‘भोला’ हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय देवगणने स्वत: केले आहे. हा साऊथचा ‘कैथी’ चित्रपटाचा रिमेक ‘भोला’ आहे. भोला’ हा चित्रपट ३D मध्ये रिलीज होणार असून चित्रपटामधून अजय आणि तब्बू स्क्रिन शेअर करणार आहेत.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

Back to top button