Urfi Javed : काय हद्द झाली राव, उर्फीनं 'डस्टबिन' प्लास्टिकचा घातला ड्रेस | पुढारी

Urfi Javed : काय हद्द झाली राव, उर्फीनं 'डस्टबिन' प्लास्टिकचा घातला ड्रेस

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री उर्फी जावेद ( Urfi Javed) आणि  भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादावर पडदा पडला असतानाच आता पुन्‍हा एकदा उर्फी जावेद चर्चेत आली आहे.  यावेळी उर्फीने सगळ्यांना मागे टाकत कचराकुंडीच्या (डस्टबिन) पास्टिकचा वापर करून ड्रेस बनवला आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद ( Urfi Javed) याने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक हटके व्हिडिओ शेअर केला आहे. यात पहिल्यांदा उर्फीच्या हातात कचराकुंडीसाठी वापरण्यात येणारी ब्लॅक रंगाची प्लास्टिकची पिशवी दिसते. यानंतर उर्फी अचानक  तिच्या हातातील प्लास्टिकचे दोन ड्रेस परिधान करताना दिसतेय. यातील पहिल्यांदा ती मिनी शॉर्ट आणि दुसऱ्यांदा स्टायलिश मिनी ड्रेसमध्ये दिसते. यादरम्यान उर्फी रेड कॉर्पेटवरदेखील अशाच पद्धतीचा ड्रेस घालणार असल्याचे म्हणते.

या व्हिडिओला तिने ‘I could literally wear this to a red carpet event not kidding, Also the og dustbin bag outfit I made in big boss was inspired by @komalpandeyofficial ! Keep inspiring ❤️’. असे लिहिले आहे. यावरून उर्फीने कोमल पांडे हिच्याकडून प्रेरणा घेवून रेड कार्पेट जाण्यास तयार असल्याचे म्हटलं आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. या व्हिडिओला पाच तासांत जवळपास ९५ हतारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजीनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे.

‘काय हद्द झाली राव येवढंच बाकी राहिलं होतं’, ‘Literally it’s better than any dress’, ‘Creativity par excellence!!!’, ‘Beauty beyond no words ! YOU ARE Epitome of Beauty’, ‘Ethereal beauty’ ,’😍😍 KITNIIII KHUBSURAT 😍😍’, ‘Oh god yeh kiya hai’. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.  दरम्यान, उर्फीला ट्रोलदेखील केलं आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

Back to top button