Salman Khan : अंबानीच्या साखरपुड्यात सलमानसोबत आलेल्या ‘त्या’ तरुणीची चर्चा | पुढारी

Salman Khan : अंबानीच्या साखरपुड्यात सलमानसोबत आलेल्या 'त्या' तरुणीची चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या साखरपुड्यात सलमान खान नेव्ही ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये दिसला. त्याने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी त्याच्यासोबत एका तरुणीनेही एन्ट्री केली. दोघेही कॅमेराबद्ध झाले आणि या दोघांचा सोहळ्यातील व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. व्हिडिओतील ती तरुणी आहे तरी कोण? अशी चर्चा रंगली. तिने पांढऱ्या रंगाचा लहंगा परिधान केला होता. हातात छोटी पर्स घेऊन तिने सलमान खानसोबत एन्ट्रीही केली.

सलमान खानने नेवी ब्ल्यू कलरचा कुर्ता पायजमा घातला होता. यामध्ये सलमान खान खूप डॅशिंग दिसत होता. तर भाची व्हाईट कलरच्या लहंग्यात खूप सुंदर दिसत होती. सिंपल वर्क लहंग्यासोबत अलीजेहने सिल्व्हर पर्स कॅरी केली होती. तिने ओपन हेअरस्टाईल आणि न्यूड मेकअप केला होता. अलीजेहने कोणताही दागिना घातला नव्हता.

कोण आहे अलिजेह?

अलिजेह खान अग्निहोत्री, सलमान खानची छोटी बहिण अलविरा खान अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्रीची मुलगी आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानची भाची अलिजेह लवकरच बॉलिवूड डेब्यू करेल. असंही म्हटलं जात आहे की, अलिजेहने आपल्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरूदेखील केले आहे. तिचा चित्रपट २०२३ मध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होत आहे. अलिजेहचा चित्रपट नॅशनल ॲवॉर्ड विनर सौमेंद्र पाधी दिग्दर्शित करत आहेत. परंतु, आतापर्यंत अलीजेहच्या चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही.

Back to top button