Heart Of Stone : आलियाचे हॉलिवूडमध्ये पदार्पण; गल गदोटसोबत धमाका (video) | पुढारी

Heart Of Stone : आलियाचे हॉलिवूडमध्ये पदार्पण; गल गदोटसोबत धमाका (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्माला घातल्यानंतर आता पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. आलिया लवकरच हॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण करत ‘हार्ट ऑफ स्टोन’ (Heart Of Stone) चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात आलिया हॉलिवूड अभिनेत्री गल गदोट ( Gal Gadot ) सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट यावर्षी ११ ऑगस्ट २०२३ रोजी चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आगामी ‘हार्ट ऑफ स्टोन’ (Heart Of Stone) चित्रपटाची एक झलक दाखविली आहे. यात पहिल्यांदा गल गदोट धावत- धावत फोनवर बोलताना दिसतेय. यावेळी फोनवर ती ‘मला माहित नाही ते काय करणार आहेत. परंतु, आयुष्यात काहीतरी वेगळं पाहण्याची संधी मिळणार आहे. यामुळे आश्चर्यकारक आहे.’ असे म्हणत आहे. या दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट एका बारमध्ये असून तिच्या हातात काचेचा ग्लास दिसत आहे.

आलियाने ‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपटाचा व्हिडिओ शेअर करताना चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा चित्रपट यावर्षी ११ ऑगस्ट २०२३ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. आलियासोबत या चित्रपटात गल गदोट, जेमी, सोफी ओकोनेडो, मथियास श्वेघोफर, जिंग लुसी आणि पॉल रेडी यांनीही भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

Back to top button