Vivek Agnihotri : ‘कश्मीर फाईल्स’ १०० रुपयांत थिएटरमध्ये पाहण्याची संधी | पुढारी

Vivek Agnihotri : 'कश्मीर फाईल्स' १०० रुपयांत थिएटरमध्ये पाहण्याची संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : द कश्मीर फाईल्स हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri ) यांनी मोठी घोषणा केली आहे. काही मिनिटांपूर्वी त्यांनी ट्विट करत कमी पैशांमध्ये हा चित्रपट पाहण्याची लोकांना संधी आहे, असे ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय पहा- (Vivek Agnihotri )

आज द कश्मीर फाईल्स चित्रपटगृहांमद्ये पुन्हा रिलीज करण्यात करण्यात आला. हा लोकांचा चित्रपट आहे. लोकांना १०० रुपयांपेक्षा कमी तिकिट दरात हा चित्रपट पाहायला मिळेल, असा मी प्रयत्न करत आहे. मला वाटतं की, मल्टिप्लेक्सवाले ऐकतील आणि आम्हाला यश मिळेल.

खरंतरं, विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती शेअर केली होती. विवेक अग्निहोत्रींनी आपल्या चित्रपटाते पोस्टर शेअर करत ट्विट केलं होतं. ‘द कश्मीर फाईल्स’ पुन्हा १९ जानेवारी रोजी रिलीज केलं जात आहे. त्यादिवशी कश्मीरी हिंदू नरसंहार दिवस आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे की, एखादा चित्रपट वर्षामध्ये दोनवेळी रिलीज होत आहे. जर तुम्हाला मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहायचा असेल तर आताच तिकिट बूकिंग करा.’

अधिक वाचा – 

Back to top button