Tunisha Sharma Death case : ‘अली’ हा तुनिषाचा जिम ट्रेनर; ‘ते’ फक्त मित्रच! वनिता शर्मा यांचा खुलासा | पुढारी

Tunisha Sharma Death case : 'अली' हा तुनिषाचा जिम ट्रेनर; 'ते' फक्त मित्रच! वनिता शर्मा यांचा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात नवनवे अपडेट समोर येताहेत. ९ जानेवारी रोजी शीझान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी वसई कोर्टात दावा केला होता की, शीझानशी ब्रेकअपनंतर तुनिषा अली नावाच्या व्यक्तीसोबत बोलत होती, त्यांची डेटिंग ॲप टिंडरवर भेट झाली होती. ते हेदेखील म्हणाले की, तुनिषाने स्वत:चे जीवन संपवण्याआधी अलीशी १५ मिनिटे व्हिडिओ कॉलवर बातचीत केली होती. (Tunisha Case) यावर तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी प्रतिक्रिया देत खुलासा केला आहे. (Tunisha Sharma Death case)

ते दोघे फक्त मित्र होते

तुनिषाची आई वनीताने एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना सांगितले की, ‘तुनिषाने मला फोन केला होता आणि सांगितलं होतं की, ती जिम ट्रेनर अलीला भेटत आहे. तो तीन महिने आधी तिचा जिम ट्रेनर होता. मृत्यूच्या तीन दिवस आधी ती अलीसोबत जेवायला बाहेर गेली होती आणि चॅटवरदेखील करत होती. ते दोघे केवळ मित्र होते आणि डिसेंबरमध्ये ते केवळ तीन वेळा भेटले होते. आता सर्व अलीची चुकी झाली का?’ असा प्रश्नदेखील वनिता शर्मा यांनी उपस्थित केला.

पोलिसांनी अलीचा जबाब नोंदवला

वनीता शर्मा म्हणाल्या की, ‘तुनिषाने मला त्याच्या भेटीविषयी सांगितले होते, परंतु एक मित्र म्हणून. शीझानचे वकिल म्हणत आहेत की, माझी मुलगी २१, २२ आणि २३ डिसेंबर रोजी घर आली नव्हती. पण हे सत्य नाही. तुनिषाच्या अंतिम संस्काराच्या दिवशी मी अलीला भेटले होते. अलीने मला सांगितले होते की, भेटीत तुनिषाने शीझानविषयी सांगितले होते. पोलिसांनी अलीचा जबाब नोंदवला आहे.’

तुनिषा केवळ ब्रेकअपमुळे चिंतेत होती

वनिता म्हणाल्या की, जर ती अलीला भेटली आहे तर यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे? ती आपल्या जुन्या सहकलाकारालादेखील भेटली होती आणि दुसऱ्या अभिनेत्याच्या पार्टीतदेखील सहभागी झाली होती. मला वाटतं की, मूळ मुद्द्यावरून लक्ष भटकण्यासाठी शीझानची फॅमिली आणि वकिलाकडे याप्रकारचे फालतू आरोप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ती केवळ ब्रेकअपमुळे चिंतेत होती.’ (Tunisha Sharma Death case)

Back to top button