जेवणाची भारतीय पद्धत आरोग्यदायी | पुढारी

जेवणाची भारतीय पद्धत आरोग्यदायी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  जुनं ते सोनं म्हणतात ते काही खोटे नाही. काट्या चमच्याने जेवण करण्याची फॅशन सर्वांना आकर्षित करते, पण आपल्या संस्कृतीत पाटावर बसून हाताने जेवण करावे, असे सांगितले गेले, तेच आरोग्यदायी असल्याचे सिद्ध झाले आहे.

भारतीय संस्कृती ही विज्ञानावर आधारित आहे. हाताने जेवण करणे हे आयुर्वेदानुसारही योग्य मानले जाते. आपण जेवण करताना पाच बोटांचा वापर करतो तेव्हा जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी ही पंचतत्त्वे जागरूक होतात. यामुळे जेवणाची चव, सुगंध अधिक चांगल्या पद्धतीने समजतो. यामुळे मन तृप्त होते. रक्ताभिसरण वाढते, बोटांचा, सांध्यांचा व्यायाम होतो. हातावर आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर जीवाणू असतात आणि हे आपल्याला पोटात गेल्यानंतर रोगापासून दूर ठेवतात. हाताने जेवण केल्याने पोट भरल्याचे लगेच समजते. त्यामुळे आवश्यकतेएवढे अन्न आपण खाऊ शकतो. हाताने हळूहळू जेवल्यामुळे अन्न पचन नीट होते. एवढे फायदे पाहून हाताने जेवण करण्याची भारतीय पद्धत आपण आता अंगीकारणार ना?

Back to top button