अविनाश हा आपल्या कुटुंबियांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या पाश्चात आई, वडील, आजी, आजोबा, चुलते व बहिण असा परिवार आहे. ऐन तारुण्यात आलेल्या अविनाशच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी एक दिवसाचा दुखवटा पाळत गाव बंद ठेवले असून धडक दिलेल्या वाहनाचा तातडीने तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.