Rakhi Sawant : राखीने बॉयफ्रेंड आदिल दुरानीशी केलं लग्न? फोटो व्हायरल

Rakhi Sawant & Adil Khan Durrani
Rakhi Sawant & Adil Khan Durrani
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड इंडस्ट्रीतील ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच तिच्या बॉयफ्रेंड आदिल दुरानीशी रिलेशनशीपवरून चर्चेत राहते. राखीने जेव्हापासून आदिलला मीडियासमोर आणले आहे, तेव्हापासून दोघे एकत्र स्पॉट होताहेत. (Rakhi Sawant ) दरम्यान, दोघांचा ब्रेकअपदेखील झाला असे म्हटले गेले. पण, दोघे आता पुन्हा चर्चेत आले आहेत, ते म्हणजे लग्नावरून. दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असून राखीने आदिलशी लग्न केल्याचे म्हटले जात आहे. पण, अद्याप या दोघांकडून या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. (Rakhi Sawant )

राखी- आदिलची जोडी बी टाऊनच्या सर्वात चर्चित जोडीपैकी एक आहे. राखीने पुन्हा एकदा लग्न केलं आणि कुणाला कळूही दिलं नाही. राखी – आदिलचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दाघांच्या हातात कोर्ट मॅरिजचे सर्टिफिकेट दिसत आङेत. दोघांच्या गळ्यात वरमाला दिसत आहे. त्यामुळे या दोघांनी लग्न केल्याचे कयास लावले जात आहेत. फोटोंच्या कमेंट सेक्शनमध्ये युजर्स राखीला विचारत आहेत की, तिने गुपचूपपणे लग्न केलं? ती चेष्टा करतेय की खरंच लग्न केलं आहे?

दुसऱ्या फोटोमध्ये दोघे लग्न नोंदणी पेपर्सवर सही करताना दिसताहेत. राखी नेहमी आदिलसोबतच्या नात्यावर उघडपणे बोलते. दोघांनाही नेहमी मीडियासमो एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना पाहण्यात आलंय. एका मुलाखतीत आदिलने म्हटलं होतं की, तो आपल्या पालकांची लग्नासाठी मनधरणी करत होता.

याआधी राखीने रितेशशी लग्न केलं आहे. त्यावेळी राखीने लग्नाचे कुठलेही फोटो शेअर केले नव्हते. त्याची ओळख तिने थेट बिग बॉसमध्ये करून दिली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news