Me Vasantrao : ‘मी वसंतराव’ ‘ऑस्कर’च्या शर्यतीत, दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया समोर | पुढारी

Me Vasantrao : 'मी वसंतराव' 'ऑस्कर'च्या शर्यतीत, दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण सिनेसृष्टीसाठी ऑस्कर हा मानाचा पुरस्कार मानला मानला जातो. ऑस्करच्या जगभरातील वेगवेगळ्या भाषेमधील तब्बल ३०० हून अधिक सिनेमांमधील यादीत भारतातील कांतारा, गंगूबाई काठियावाडी, द कश्मीर फाईल्स बरोबरच ‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटाचा समावेश होणे खरंच खूप गौरवाची बाब आहे. (Me Vasantrao)

याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात, ‘मी वसंतराव’ या चित्रपटावर आम्ही तब्बल ९ वर्षं काम केले आहे. एखाद्या महान व्यक्तीचा जीवनपट पडद्यावर दाखवणे हे फार आव्हानात्मक काम होते. पण यात तो काळ, व्यकितमत्वाचे पैलू, निर्मिती प्रक्रिया आणि मुख्य म्हणजे संगीत, हे सर्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले आहे आणि याचीच दाद म्हणून आज ऑस्कर सारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या नामांकन यादीमध्ये मी वसंतरावचा विचार केला जातोय हे खूप अभिमानास्पद आहे.

गायक-अभिनेता राहुल देशपांडे म्हणाले की, ‘ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण, यानिमित्ताने आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. शिवाय मराठी चित्रपट व संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचे आहे असे मी मानतो. ‘मी वसंतराव’ हा चित्रपट एक वेगळाच प्रयोग होता. यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचीच कथा मी त्यांचा नातू एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो आहे. इतकेच नव्हे तर त्यातील गाणी आणि संगीतदिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या या नामांकनाने मला खूप आनंद झाला आहे.’

Back to top button