Aryan Khan : आर्यन खान कोणाला डेट करतोय? चर्चेला उधाण

Aryan Khan : आर्यन खान कोणाला डेट करतोय? चर्चेला उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan )  ड्रग्ज प्रकरणी झालेल्‍या कारवाईनंतर  चर्चेत आला होता. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण वेगले आहे. त्याचं नाव अनेक अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. त्याच नाव पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानसोबत जोडलं जात आहे.  सोशल मीडियावर त्यांचा फोटो व्हायरंल झाल्‍याने आर्यन खानच्‍या पाकिस्‍तान अभिनेत्रीबरोबरील अफेअरच्‍या  चर्चेला उधाण आलं आहे.

आर्यन खान त्याच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्याचा आणि पाकिस्तानी अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आ, सादिया खान. हिच्यासोबत आर्यन खानच नाव जोडलं जात आहे. त्यांच्या डेटींगच्या चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Aryan Khan कोणाला डेट करतोय?

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बॉलिवूड कलाकार दुबईला गेले होते. यामध्ये आर्यनसह नोरा फतेहीचाही समावेश होता. या दोघांच्या डेटींगच्या चर्चेला उधाण आलं होतं.त्‍याच पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरलं झाले होते. आता आर्यन खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरंल होत आहे. हा फोटो कोणत्या पार्टीमधील आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण आर्यन नेमकं कोणाला डेट करत आहे? यावर चर्चा सोशल मीडियावर होवू लागली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news