Shankutalam : अल्लु अर्जुनची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पणास सज्ज; सामंथासोबत दिसणार 'शंकुतलम'मध्ये

पुढारी ऑनलाईन न्यूज : पुष्पा फेम अभिनेता अल्लु अर्जुन नेहमी त्याच्या फॅमिलीसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करून सोशल मीडियात सक्रीय असतो. अल्लु यांची ६ वर्षाची मुलगी आरहा बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ती फिल्मी जगतात अभिनयाचा ठसा उमटवण्यास तयार आहे. आरहा बॉलिवूड अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूसोबत ‘शंकुतलम’ ( Shankutalam ) या चित्रपटात दिसणार आहे. अल्लू अर्जूनने त्याच्या करिअरची सुरूवात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून केली होती.
अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिचा ‘शकुंतलम’ ( Shankutalam ) हा चित्रपट येत्या १७ फेब्रुवारी २०२३ रोजी चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात आरहा चाईल्ड आर्टिस्टची भूमिका साकरणार आहे. आरहा मोठी झाल्यावर सिनेसृष्टीत येणार असल्याची माहिती अल्लू अर्जुन यांनी एका मुलाखतीत याआधीच दिली होती. परंतु, ऐवढ्या कमी वयात बॉलिवूडमध्ये येणार यांची कल्पना कोणालाच नव्हती.
- रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’चा बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ, १० दिवसांत ३३ कोटींची कमाई, ‘लयभारी’ला टाकणार मागे
अल्लू अर्जून त्याच्या फॅमिलीसोबतचे अनेक वेळा फोटोशूट करत असतात. या फोटोत त्याच्या पत्नीसोबत मुलगी आरहाचा क्युटनेसपणा चाहत्यांना पाहायला मिळाला. आरहाचा जन्म २१ नोव्हेंबर २०१६ रोजी झाला. सांमथाचा ‘शंकुतलम’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. हा चित्रपट १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सिनेमागृहात रिलीज होत आहे. सामंथासोबत या चित्रपटात देव मोहन हे दिसणार आहेत. हा चित्रपट तेलगू भाषेत असून चित्रपटाची निर्मिती गुन शेखर यांनी केली आहे.
हेही वाचलंत का?
- Rinku Rajguru : ‘दिस वाटे वेगळा अन् …’; आर्ची प्रेमात पडली❤️?
- Sai Tamhankar : ‘काय म्हणताय फरशी पुसताना सईचा तोल गेला!❤️❤️’…
- Jacqueline Fernandez : जॅकलिनचा संडे स्पेशल मेनू बिर्याणी की… (video)
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram