Katrina-Vicky : कॅटरिना- विक्की कौशलची जंगल सफारी; दोघांनी एकांतात घालवले क्षण | पुढारी

Katrina-Vicky : कॅटरिना- विक्की कौशलची जंगल सफारी; दोघांनी एकांतात घालवले क्षण

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) ला ‘क्यूट कपल’ म्हणून ओळखले जाते. Katrina-Vicky दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असून त्याच्याबद्दल अपडेट्स शेअर करत असतात. यामुळे कपलला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांकडून फॉलो केले जाते. सध्या कॅटरिना- विक्कीने एका जंगलाची सफारी केली आहे. निसर्गरम्य ठिकाणाचे खास फोटो दोघांनीसोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री कॅटरिना कैफने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नुकतेच जंगल सफारीचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये हे कपल जंगलात असून मनसोक्त आनंद लूटताना दिसतेय. य़ावेळी कॅटने सात फोटोज शेअर केले आहेत. शेअर केलेल्या पहिल्या फोटोत कॅट सुंदर स्माईलसोबत पोझ देताना दिसतेय. दुसऱ्या फोटोमध्ये कॅट आणि विक्की दोघेजण एका चटईवर बसलेले असून डोंगरावर दिसतात. पुढील चार फोटोत जंगलातील काही प्राणी दिसतात आणि शेवटच्या फोटोत जंगलातील निसर्गावर पडलेला सूर्यप्रकाश अप्रितम दिसतो.

संबंधित बातम्या

यावेळी कॅटने व्हाईट – ब्लॅक रंगाचा शर्ट- पॅन्ट आणि ब्लॅक टोपी तर विक्कीने जॅकेट, टिशर्ट- पॅन्ट आणि ब्लॅक चष्मा परिधान केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘So Magical ….. I think one of my favourite places ever ☀️’ असे लिहिले आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव करत कॉमेन्टस् केल्या आहेत. ‘Kis kisko Katrina cute lagti hai 😍’, ‘Vicky ko kaha chod diya😂’, ‘Jawai❤️📍’, ‘Hot 🥵🔥’, ‘Cute 🥰🥰’, ‘Karismatic Katrina❤️❤️’, ‘Bueatifull’, ‘❤️ love you guys ❤️’, ‘😍 super’, ‘Mast’, ‘Super❤❤🔥🔥’, ‘Nice 👍’, ‘Wowee😍😍❤️’, ‘Ohhh hoo 😍😍’, ‘So sweet ❤️❤️’, ‘So amazing pictures 🤩🤩’. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत २ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

याआधी कॅट आणि विक्कीने ( Katrina-Vicky ) कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला होता. या फोटोत कॅटरिना कैफ, विक्की कौशल, भाऊ सनी कौशल यांच्यासह आई-वडील दिसत होते. यावेळी प्रत्येकाने सुंदर स्मितहास्यांसह मोहक पोझ दिल्या आहेत. याच दरम्यान विक्कीने ख्रिसमस ट्रीचा फोटोही शेअर केला होता. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते.

कॅटरिना कैफ आणि विक्कीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कॅट ‘टायगर ३’, ‘मेरी ख्रिसमस’ मध्ये अभिनेता विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत ‘जी ले जरा’ चित्रपट आहे. तर विक्की शेवटचा ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर विक्कीकडे ‘सॅम बहादूर’ चित्रपटाचा बायोपिकदेखील आहे. ( Katrina-Vicky )

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Back to top button