madhura deshpande
madhura deshpande

अभिनेत्री मधुरा देशपांडेचं तीन वर्षांनंतर दमदार पुनरागमन

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेक्षकांसाठी स्टार प्रवाहवरील नवी मालिका 'शुभविवाह' १६ जानेवारीपासून सुरु होतेय. सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा देशपांडे या मालिकेत झळकणार आहे. तीन वर्षांनंतर ती शुभविवाहच्या निमित्ताने मालिका विश्वात पुनरागमन करणार आहे. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे शुभविवाह ही मालिका.

भूमी या व्यक्तिरेखेविषयी सांगताना मधुरा म्हणाली, 'तीन वर्षांच्या गॅपनंतर मी मालिकेत काम करत आहे. स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना अतिशय आनंद होत आहे. भूमी हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. कारण भूमीसारखी इतका पराकोटीचा त्याग करणारी व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारते आहे. कुटुंबावर भरभरुन प्रेम करणारी भूमी कुटुंबाच्या सुखासाठी काहीही करु शकते. भूमीचे नवनवे पैलू मला दररोज उलगडत आहेत. आमची टीम खूप छान आहे. त्यामुळे शुभविवाहच्या निमित्ताने एक छान कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी भावना मधुरा देशपांडेने व्यक्त केली.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news