Pankaj Tripathi : ‘मैं अटल हूँ ‘चे पहिले पोस्टर रिलीज | पुढारी

Pankaj Tripathi : 'मैं अटल हूँ 'चे पहिले पोस्टर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क :  दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूँ ‘ हा चित्रपट घेवून राष्‍ट्रीय  पुरस्‍कार विजेते दिग्‍दर्शक रवी जाधव आणि अभिनेते पंकज त्रिपाठी ( Pankaj Tripathi ) येत आहेत. पंकज यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मुख्य भूमिका साकारली आहे. वाजपेयी यांच्या ९८ व्या जंयतीनिमित्त आज ( दि. २५) या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी त्यांच्या इंन्स्टावर ‘मैं अटल हूं!’ म्हणत अटल बिहारी वाजपेयी यांच्या लूकमधील पोस्टर शेअर केलं आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी म्‍हटलं आहे की, ‘ हे अद्वितीय व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली. मी भावनिक आहे. मी आभारी आहे. #MainAtalHoon सिनेमागृहात, डिसेंबर २०२३. असे लिहिले आहे.

दुसऱ्या एका पोस्टरच्या कॅप्शनमध्ये ‘अटलजी यांचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारण्यासाठी मला संयमाने काम करणे आवश्यक आहे, हे मला माहीत आहे. उत्साह आणि मनोबलाच्या जोरावर मी माझ्या नव्या भूमिकेला न्याय देऊ शकेन, असा मला ठाम विश्वास आहे.  MainAtalHoon सिनेमागृहात, डिसेंबर २०२३. असे लिहिले आहे.‘मैं अटल हूं’ हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्‍या भेटीस येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

हेही वाचा :  

Back to top button