पुणे : पीएमपीएल पास केंद्रातून 10 हजारांची रोकड चोरीला

पुणे : पीएमपीएल पास केंद्रातून 10 हजारांची रोकड चोरीला
Published on
Updated on

पुणे : पीएमपीएलच्या विश्रांतवाडीतील कार्यालयानजीक असलेल्या पास केंद्रातून चोरट्यांनी 10 हजार 700 रुपयांची रोकड चोरून नेली.
ही घटना 21 डिसेंबरला संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास विश्रांतवाडीतील विमाननगर रस्त्यावरील कार्यालयात घडली. व्यंकटी धनगरे (वय 42, रा. भोर) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यंकटी हे पीएमपीएलमध्ये विश्रांतवाडी परिसरातील पास केंद्रात नियुक्तीला आहेत. 21 डिसेंबरला संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास ते पास केंद्राला कुलूप लावून लघुशंका करण्यासाठी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी पास केंद्राचा दरवाजा वाकवून 10 हजार 700 रुपयांची रोकड चोरून नेली. व्यंकटी हे परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महेश चव्हाण तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news