कोळ्याने केली अजगराची शिकार! | पुढारी

कोळ्याने केली अजगराची शिकार!

लंडन : कोळ्याच्या जाळ्यात छोटे-मोठे कीटक किंवा छोटे पक्षी अडकू शकतात हे आपल्याला माहिती आहे. मात्र, कधी कधी काही मोठ्या आकाराचे प्राणीही त्यामध्ये अडकून जीव गमावू शकतात. तरीही एखादा अजगर अशा जाळ्यात अडकेल व त्याला प्राण गमवावा लागेल याची आपण कल्पना करणार नाही; पण असे घडले आहे. त्याचा एक व्हिडीओही आता व्हायरल झाला आहे.

हा थरारक व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. व्हिडीओत एक छोटा अजगर दिसतो. सुरुवातीला तो हवेत लटकल्यासारखा दिसतो; पण व्हिडीओला बारकाईने पाहिल्यानंतर तो अजगर कोळ्याच्या जाळ्यात अडकला असल्याचे दिसते. अजगर त्या जाळ्यातून स्वत:ला सोडवण्याचा अतोनात प्रयत्न करतो; पण त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. कोळी संधी साधून अजगराला चावण्याचा प्रयत्न करतो आणि काही वेळानंतर अजगर तडफडून मरण पावल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळण्यास मार्ग नाही. कोळ्याच्या जाळ्यात अजगर अडकल्याने कोळ्याने त्याच्यावर हल्ला करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही. ही सर्व थरारक द़ृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. कारण छोट्या कोळ्याने अजगराला जाळ्यात अडकवून त्याच्यावर हल्ला चढवल्याचे क्वचितच समोर आले.

संबंधित बातम्या
Back to top button