सांगली : 416 ग्रामपंचायतींचा आज फैसला; उत्सुकता शिगेला | पुढारी

सांगली : 416 ग्रामपंचायतींचा आज फैसला; उत्सुकता शिगेला

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवारी (दि.20) होत आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपाययोजना आणि पूर्वतयारी करण्यात आली आहे. निवडणूक निकाल काय लागणार, याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत मतमोजणी कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होत्या. उपविभागीय अधिकारी, पोलिस अधिकारी, तहसीलदार सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. मिरज तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींची 22 टेबलावर, तासगाव तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींची 15 टेबलावर, कवठेमहांकाळ तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींची 15 टेबलावर, जत तालुक्यातील 77 ग्रामपंचायतींची 20 टेबलावर, खानापूर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींची 16 टेबलावर, आटपाडी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींची 15 टेबलावर,कडेगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींची 19 टेबलावर, पलूस तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची 14 टेबलावर, वाळवा तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींची 30 टेबलांवर, शिराळा तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींची 15 टेबलांवर मतमोजणी होणार आहे.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रथम जितके टेबल आहेत, त्या टेबलवर पूर्ण एक गाव अशा पध्दतीने जेवढी गांवे एकावेळी टेबलवर घेता येतात त्याप्रमाणे त्या गावांचे प्रतिनिधी / उमेदवार यांना मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार आहे . त्या गावची मतमोजणी संपल्यानंतर सदर उमेदवार बाहेर गेल्यानंतर इतर गावांची मतमोजणी केली जाणार आहे. गर्दी तसेच जमाव एकत्रित येऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणे

मिरज – शासकीय धान्य गोडावून, वैरण बाजार
कवठेमहांकाळ – तहसील कार्यालय प्रशासकीय इमारत तासगाव – बहुउद्देशीय हॉल तहसील कार्यालय खानापूर-विटा – शासकीय धान्य गोदाम, विटा आटपाडी – मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय जत – तहसील कार्यालय जत पलूस – मध्यवर्ती प्रशासकीय कडेगाव – महात्मा गांधी विद्यालय कडेगाव वाळवा – शासकीय धान्य गोदाम, इस्लामपूर शिराळा – तहसील कार्यालय प्रशासकीय इमारत.

Back to top button