

पुढारी ऑनलाईन : अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी 'वेड लावलंय' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. अलीकडेच चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी लाँच करण्यात आली आहेत. दोन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे.
सलमान खान या चित्रपटात खरेच झळकणार आहे. रितेशच्या वाढदिवशी सलमान चित्रित झालेल्या 'वेड लावलंय' या गाण्याचा टीझर रीलिज करण्यात आला आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर गाण्याचा टीझर शेअर केला आहे. रितेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा टीझर शेअर केल्याचे त्याने सांगितले आहे.
हेही वाचलंत का?