इंदापूर : डाळिंबाच्या चारशे झाडांवर मारले विषारी औषध | पुढारी

इंदापूर : डाळिंबाच्या चारशे झाडांवर मारले विषारी औषध

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : पळसदेव-माळवाडी (ता. इंदापूर) येथे एका शेतकर्‍याच्या डाळिंबाच्या 400 झाडांवर विषारी औषध फवारणी करून नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल आहे. रामचंद्र अनंता भोंग या शेतकर्‍याच्या गट नंबर 194 मधील डाळिंबाच्या 400 झाडांवर अज्ञाताने औषध फवारणी करून मोठे नुकसान केले.

शेतकऱ्यांचे पहिलेच अस्मानी नुकसान होत असताना आता काही लोक त्यांचा अंतर्गत रागदेखील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांवर काढत असल्याचे यातून दिसून आले. दरम्यान, भोंग यांच्या तक्रारीनंतर इंदापूर पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.

Back to top button