Aamir Khan : एक्स वाईफ किरण रावसोबत आमिरने केली कलश पूजा (photos) | पुढारी

Aamir Khan : एक्स वाईफ किरण रावसोबत आमिरने केली कलश पूजा (photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड स्टार आमिर खानचे लेटेस्ट फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियाचे लोक भडकले आहेत. आमिर नुकताच त्याच्या ऑफिसमध्ये पूजा आणि आरती करताना दिसला. त्याच्यासोबत त्याची एक्स पत्नी किरण रावही होती. या फोटोंमधील आमिरचा लूक लोकांना साऊथचा स्टार जगपती बाबूची आठवण करून देत आहे.

आमिर खान आणि किरण राव

आमिर खानने आपल्या चित्रपटांमधून एकाहून एक नवीन लूक लोकांना दिला आहे. ‘रंग दे बसंती’पासून ‘फना’ आणि ‘गजनी’पर्यंत आमिरने जेव्हा जेव्हा पडद्यावर नवीन लूक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चाहत्यांनी त्याला खूप फॉलो केले. पण, आता आमिरच्या खऱ्या आयुष्यातील लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या लूकमधील फोटो पाहून अनेकांना तो आमिर आहे की आणखी कोणी हे ओळखू शकत नाही.

आमिरचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो त्याच्या ऑफिसमध्ये पूजा करताना दिसत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’चे दिग्दर्शक अद्वैत चंदनने पूजाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये आमिर कलशाची पूजा करत आहे. पूजेनंतर ते आरतीही करत आहेत आणि त्याची माजी पत्नी किरण रावही त्याच्यासोबत दिसत आहे.

या फोटोंमध्ये आमिरचे केस, दाढी आणि मिशा पूर्णपणे पांढरे दिसत आहेत. पूजा करताना आमिरने नेहरू टोपी घातली असून गळ्यात गमचाही आहे. सोशल मीडियावर आमिरच्या या ऑल-ग्रे लूकवर लोकांच्या खूप इंटरेस्टिंग कमेंट्स येत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘मी नाव वाचले नव्हते आणि मला वाटले की ते शक्ती कपूर आहे.’ आणखी एका युजरने साऊथ अभिनेता जगपती बाबूची आठवण केली, ज्याचा लूक सारखाच आहे. या यूजरने लिहिले की, ‘भाई, तो साऊथ अॅक्टर जगपती बाबूसारखा दिसतो.’

आमिरने अभिनयातून घेतला ब्रेक

अद्वैत चंदनने आपल्या पोस्टमध्ये हे सांगितले नाही की, ही पूजा आमिर खान प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये कशासाठी ठेवण्यात आली होती. मात्र फोटोंमध्ये सगळेच खूप आनंदी दिसत आहेत. आमिरबद्दल बोलायचे झाले तर त्याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, तो अभिनयातून ब्रेक घेत आहे. आता दीड वर्षानंतर अभिनय क्षेत्रात परतणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. मात्र, यावेळी तो निर्माता म्हणून दिसणार आहे.

फोटोंमध्ये आमिर आणि किरण राव एकत्र उभे राहून आरती करताना दिसत आहेत. किरणने आरतीचे ताट हातात घेतले आहे आणि आमिर हात जोडून उभा आहे. आमिर आणि किरण यांचे गेल्या वर्षी वैवाहिक जीवन संपुष्टात आले होते. बर्‍याचदा दोघेही पार्ट्या, विमानतळ इत्यादी ठिकाणी एकत्र पाहिले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Advait Chandan (@advaitchandan)

Back to top button