भाग्य दिले तू मला : राज- कावेरीच्या सुंदर नात्याची सुरुवात होणार? | पुढारी

भाग्य दिले तू मला : राज- कावेरीच्या सुंदर नात्याची सुरुवात होणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मालिकेमध्ये राज आणि कावेरी एकमेकांना आपल्या मनातील भावना कधी व्यक्त करणार? राज कावेरी कधी एकत्र येणार? या दोघांचे लग्न कधी होणार? असे अनेक प्रश्न आणि याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. मालिका सुरू झाल्यापासूनच बोक्या आणि काकूच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यांच्यातील लुटूपुटूची भांडणे असो वा कावेरीने राजची समजूत काढणे असो वा राजने कावेरीला आधार देणे, त्यांच्यात आलेला दुरावा असो प्रेक्षकांनी त्यांची साथ कधीच सोडली नाही. पण, कावेरीने तिच्या मैत्रिणीसाठी म्हणजेच वैदेहीसाठी प्रेमाचा त्याग केला.

वैदेहीने कावेरीपासून अनेक गोष्टी लपवून ठेवल्या. खोटं वागली. पण आता मात्र वैदेहीचा खरा चेहरा कावेरी सगळ्यांसमोर आणणार आहे. कावेरीच्या हाती तिने राजला लिहिलेले पत्र लागणार आहे ज्यावरून वैदेहीचा पर्दाफाश होणार आहे. भर मंडपात कावेरी लग्न थांबवणार आहे आणि वैदेहीच्या कानफडीत मारणार आहे. आता सगळ्या प्रकारामुळे राज – कावेरीच्या सुंदर नात्याची सुरुवात होणार? राज वैदेहीचे लग्न होणार? या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Back to top button