Urfi Javed video : कल्पनाच करवत नाही; तुटलेल्या सायकलच्या चेन्स गुंडाळल्या शरीराला | पुढारी

Urfi Javed video : कल्पनाच करवत नाही; तुटलेल्या सायकलच्या चेन्स गुंडाळल्या शरीराला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अंतरंगी, स्टायलिश आणि नवनविन फॅशनने नेहमीच चर्चेत असते. तिच्या हटके फॅशनने सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जातेय. परंतु, उर्फीची अनोखी फॅशन काय थांबायचे नाव घेत नाही. याआधी उर्फीने साखळी, प्लॅस्टिक, काच यासारख्या अनेक साधनांचा वापर फॅशनसाठी केला होता. तर सध्या चक्क तिने सायकलच्या चेनपासून कपडे तयार करून परिधान केले आहेत. यामुळे सोशल मीडियावरील चाहत्य़ांनी पुन्हा तिच्यावर कॉमेन्टचा पाऊस पडत ट्रोल केलं आहे. ( Urfi Javed video )

अभिनेत्री उर्फी जावेदने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात उर्फी पहिल्यांदा मेंहदी कलरच्या टॉप आणि स्कर्टमध्ये सायकलवरून फिरण्याचा मनोसोक्त आनंद घेताना दिसली. यावेळी तिच्या आजूबाजूला सुंदर रस्ता, अॅटोरिक्षा आणि काही झाडे दिसतात. परंतु, रस्त्याच्या मध्येच उर्फीच्या सायकलची चेन खराब होवून तुटते. यानंतर उर्फी सायकलवरून पटकन खाली उतरते आणि ती चेन हातात घेवून फिरवते. यानंतर तिला एका युजर्सने कॉमेन्टमध्ये म्हटलेलं ‘सायकलची चेनचा वापर कर’ हे वाक्य आठवते. यानंतर चक्क ती सायकलच्या चेनपासून तिचा टॉप आणि स्कर्ट बनवून परिधान करते.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘सायकलची चेन!! मी यापासून कधी ड्रेस बनवेल याचा कधी विचारच केला नव्हता! ही माझी कल्पना नाही, एका युजर्सने गंमतीनं म्हटलं होतं की, हिने सायकलच्या चेनपासून ड्रेस बनवला होता. यानंतर मी वाट पाहत होते की, मी अशी फॅशन कधी करणार. आता माझ्या सायकलची चेन तुटली आणि मला यापासून ड्रेस बनवण्याची संधी मिळाली. तो पहा असाच 🤪’. तिच्या पायात ब्लॅक रंगाचे सॅडल आहे. यातील खास म्हणजे, तिने मोकळ्या केसांची स्टाईल आणि सायकलच्या चेनचे हातात ब्रेसलेट परिधान केलं आहे. उर्फीला यावेळी तिच्या लूकमुळे खांद्याला किरकोळ जखम झाल्याचीही माहिती मिळतेय.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी पुन्हा तिच्या कपड्यावरून अनेक कॉमेन्टस करत ट्रोल केलं आहे. याच दरम्यान एका युजर्सने ‘देव पण विचार करत असेल की, कोणाला जन्माला घातलंय’. ‘मर्यादा सोडल्या आहेत.’ असे म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘स्वत: च्या घरात अशा खुपसाऱ्या खराब चेन पडल्या आहेत त्याचाही वापर कर’. असे म्हणत ट्रोल केलं आहे. ( Urfi Javed video )

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

Back to top button