Bangladesh vs India Test Series : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मोहम्मद शमीच्या जागी जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) याला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे तब्बल १२ वर्षानंतर गोलंदाज जयदेव भारतीय संघात सहभागी होत आहे. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका १४ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. जयदेव उनाडकटने २०१० मध्ये भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या उनाडकटने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो २०१९-२० रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. यादरम्यान त्याने एकूण ६७ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्र संघाने रणजी विजेतेपदही पटकावले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत त्यांच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवण्यात यश आले होते.
भारत आणि बांगलादेश यांच्यात २ कसोटी सामने होणार आहेत. पहिला कसोटी सामना १४ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. यानंतर २२ डिसेंबरपासून मालिकेतील दुसरा कसोटी सामना होणार आहे.
जर उनाडकटला (Jaydev Unadkat) मालिकेतील कोणत्याही कसोटीत खेळण्याची संधी मिळाली तर पहिल्या कसोटी सामन्यानंतर दुसरा कसोटी सामना खेळण्याचा सर्वात लांब अंतराचा विक्रम त्याच्या नावावर होऊ शकतो. हा विक्रम सध्या भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलच्या नावावर आहे, ज्याला कसोटी क्रिकेटमध्ये वापसी करण्यासाठी आठ वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. उनाडकट तब्बल १२ वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात परतला आहे. (Bangladesh vs India Test Series)
हे ही वाचा :