Hansika Motwani Wedding : हंसिकाने सोहेलसोबत घेतले सात फेरे (Photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : हंसिका मोटवानीने तिचा बिझनेस पार्टनर सोहेल कथुरियासोबत लग्न केले आहे. अभिनेत्रीच्या लग्नाचा पहिला (Hansika Motwani Wedding) फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये ती वधुवेषात खूप सुंदर दिसते. अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि बिझनेसमन सोहेल कथुरिया यांची जोडी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या क्यूट कपलचे ४ डिसेंबर रोजी लग्न झाले. चाहते हंसिकाच्या लग्नाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत होते आणि पण आता प्रतीक्षा संपली आहे. या रॉयल कपिलच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वधूच्या रुपात हंसिका एखाद्या राजकन्येपेक्षा कमी दिसत नव्हती. अभिनेत्रीने लाल हेवी लेहेंग्यासह स्टायलिश दागिने घातले होते. (Hansika Motwani Wedding)
गेल्या आठवडाभरापासून हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. अभिनेत्रीच्या घरी अनेक सोहळे पार पडले. प्रत्येक फोटोमध्ये ती आनंदाचे क्षण एन्जॉय करताना दिसत होती. हंसिका आणि सोहेलचे अखेर लग्न झाले असून अभिनेत्रीच्या लग्नाचे पहिला फोटो आणि व्हिडिओही समोर आला आहे.
हंसिकाचा क्लासी लूक
हंसिकाने लग्नात पारंपरिक वधूप्रमाणेच पण फिल्मी स्टाईलमध्ये प्रवेश केला. लग्नापर्यंतच्या प्रत्येक फंक्शनपासून तिने आपला लूक क्लासी ठेवला होता. फंक्शननुसार हंसिकाने तिचा गेटअप तयार केला. माता की चौकीसाठी साधी लाल साडी नेसली, मग सूफी नाईट संगीतासाठी क्रीम शरारा तर, प्री-वेडिंग पार्टीसाठी पांढरा ड्रेस आणि संगीतासाठी गुलाबी-निळ्या कॉम्बिनेशनचा सुंदर लेहेंगा. मेहेंदी समारंभात तिचा लूक साधा ठेवला. नंतर हळदी समारंभात, फुलांच्या प्रिंटच्या साध्या ड्रेसमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हंसिका मोटवानीच्या लग्नाचे सर्व सोहळे थाटामाटात पार पडले. हंसिकाने प्री-वेडिंग पार्टीत हृतिक रोशन आणि कॅटरिना कैफच्या गाण्यांवर डान्स केला.
आयफेल टॉवर समोर फोटोशूट
हंसिकाने नोव्हेंबरमध्ये तिच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. हंसिकाला सोहेलने आयफेल टॉवरसमोर प्रपोज केले होते. या सुंदर क्षणाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने सोहेलसोबत तिच्या एंगेजमेंट आणि लग्नाची घोषणा केली होती.
कोण आहे सोहेल कथुरिया ?
हंसिका आणि सोहेल बिझनेस पार्टनर आहेत आणि एकत्र इव्हेंट मॅनेजमेंट करतात. सोहेलचा कापड्याचा व्यवसायही आहे, जो १९८५ पासून कपड्यांची निर्यात करत आहे. हंसिका ही सोहेलची दुसरी पत्नी आहे. त्याची पहिली पत्नी रिंकी बजाज होती. सोहेलचा आणि रिंकीचा घटस्फोट झाला आहे.
- Lalu Prasad Yadav health : लालू यांच्यावर आज किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया; किडनी दान करण्यापूर्वी मुलीची भावूक पोस्ट
- बुडित खातं कोण खातंय?
- Gujarat Election Polling for final phase : गुजरात निवडणूक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram