Akshaya-Hardeek Wed : हळद-संगीत सोहळ्यात अक्षया-हार्दिकची धमाल, आज लग्नबंधनात अडकणार | पुढारी

Akshaya-Hardeek Wed : हळद-संगीत सोहळ्यात अक्षया-हार्दिकची धमाल, आज लग्नबंधनात अडकणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुझ्यात जीव रंगला फेम पाठबाई अर्थातच अक्षया देवधर आणि राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी हे आज लग्नबंधनात अडकणार आहेत. कालचा दिवस देवधर आणि जोशी कुटुंबीयांसाठी मोठा आनंदाचा होता. (Akshaya-Hardeek Wed) अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा सामूहिक संगीत सोहळा आणि हळदी सोहळा पार पडला. या सोहळ्यादरम्यानचे खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. अक्षया आणि हार्दिक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खूप सुंदर व्हिडिओज शेअर केले आहेत. अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज (२ डिसेंबर, २०२२) विवाहबंधनात अडकणार आहेत. (Akshaya-Hardeek Wed)

अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर या दोघांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. त्याआधी काल दोघांचा सामूहिकरित्या संगीत सोहळा आणि हळदीचा सोहळा पार पडला. यावेळी ‘तुझ्यात जीव रंगला’चे कलाकार सोहळ्यात उपस्थित होते.

यावेळी अक्षया आणि हार्दिक यांनी सुंदर डान्स केला. तर हळदी समारंभाला या कपलने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. दोघांनीही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापेक्षा एक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना त्यांनी Sangeet Night!✨Just the way we wanted.❤️ अशी कॅप्शन दिलीय. काही फोटो आणि व्हिडिओंना त्यांनी म्हटलंय-Cool❤️, हळद लागली. 💛, Nachu de nachu de! Dinghana ghalu de!❤️🎊 #अहा ❤️, हार्दिक आणि अक्षयाच्या हळदीचे खास क्षण! ❤️, #अहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amol Ramchandra Naik (@amolnaik.cool)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Komal Shete | Artist (@shetekomal_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amol Ghodke (@amolghodake_)

Back to top button