बिग बॉस मराठी -4 : अपूर्वा झाली भावूक | पुढारी

बिग बॉस मराठी -4 : अपूर्वा झाली भावूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात स्नेहलता आणि अपूर्वाची मैत्री हळूहळू घट्ट होत आहे. खेळाव्यतिरिक्त देखील त्या दोघी एकमेकींशी बऱ्याच गोष्टी शेअर करताना दिसतात. आज अपूर्वा स्नेहलताशी बोलताना दिसणार आहे. गेल्या पाच वर्षात तिच्यात झालेले बदल स्नेहलताला सांगताना ती भावूक होणार आहे. असं नक्की झालं घरात ज्यामुळे ती भावूक झाली.

अपूर्वा म्हणाली, दोन perspective च्या व्यक्ती मला एकाच दिवशी भेटल्या या घरात. म्हणजे उदाहरणार्थ मीरा भेटली जी मला म्हणाली, मला तू माझ्यासारखी वाटतेस. जे मनात आहे, जे डोक्यात आलं ते तू तोंडावर बोलतेस आणि मोकळी होतेस. तिने appreciate केलं आणि हा व्यक्ती म्हणतो आहे (आरोह) तेच मला नाही आवडलं. तर हा perspective चा भाग आहे, तू मला माझा मूळ स्वभाव बदलायला सांगतो आहेस, इतकं नाहीना होऊ शकतं.

एखादी व्यक्ती एका situation ला रिऍक्ट करते त्याचा अर्थ काहीतरी असं असेल की ही व्यक्ती दरवेळा अशी का रिॲक्ट करते. काही लोक जी मला पाच वर्ष आधी भेटले आहेत ते shocked असतील मला असं बघून की अपूर्वा अशी रिॲक्ट करते? आता नक्की काय घडलं ज्यामुळे हे संभाषण सुरु झालंअ? बघूया आजच्या भागामध्ये.

Back to top button