‘द काश्मीर फाइल्स’वरील नदाव लॅपिड यांच्या विधानानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया | पुढारी

'द काश्मीर फाइल्स'वरील नदाव लॅपिड यांच्या विधानानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या ज्युरी प्रमुखांनी ‘द काश्मीर फाइल्स’चे वर्णन ‘असभ्य आणि दुष्प्रचारक चित्रपट’ असे केले. ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी याला दुष्प्रचार करणारा चित्रपट म्हटले. त्यांच्या या विधानानंतर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. लॅपिड इस्रायली असल्याने मुस्लिम विरोधी “काश्मीर फाईल्स” चालवून घेईल, अशी सरकारची अपेक्षा होती. पण लॅपिड यांनी सणसणीत चपराक लगावली असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

“तो इस्रायली असल्याने मुस्लिम विरोधी “काश्मीर फाईल्स” चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण “प्रचारकी आणि गलिच्छ” चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदाव लापिडने सणसणीत चपराक लगावली”, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

असभ्य श्रेणीतला चित्रपट (International Film Festival)

गोव्यातील ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बड्या कलाकारांनी सहभाग घेतला. पण, याच दरम्यान ज्युरी आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाबाबत दुष्प्रचारक करणारा म्हटल्यावर मात्र तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. खरं तर, या चित्रपटाबाबत विवेक अग्निहोत्रीचा दावा आहे की, ‘द काश्मीर फाइल्स…’ मधून त्यांनी काश्मिरी पंडितांची दुर्दशा दाखवली आहे. या चित्रपटाने थिएटरमध्येही चांगला व्यवसाय केल्याची माहिती आहे. पण इस्त्रायली चित्रपट निर्मात्याने याचे वर्णन असभ्य श्रेणीचा चित्रपट असे केले. (International Film Festival)

हेही वाचा :

Back to top button