Drishyam 2 collection : ‘दृश्यम २’ चा दहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका, जाणून घ्या कमाई…
पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय देवगणचा 'दृश्यम 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हा सिनेमा १८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. १० दिवसानंतरही या चित्रपटाला रसिकांची पसंती मिळत आहे. (Drishyam 2 collection)
प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीच चित्रपटाने बजेटपेक्षा जास्त कमाई केली होती. आता ही कमाई १५० कोटींची जवळ पोहचली आहे. आज दहाव्या दिवशी या सिनेमाने किती कमाई केली याचे आकडे समोर आले आहेत. अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दृश्यम २' ने पहिल्याच दिवशी १५.३८ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी २१.५९ कोटींची कमाई केली. दृश्यम रविवारच्या सुट्टीचा चांगलाच फायदा झालेला पहायला मिळाला.
Drishyam 2 collection : १५० कोटींचा आकडा पार करणार ?
तिसऱ्या दिवशी या सिनेमाने २७.१७ कोटींची टप्पा पार केला. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या दिवशी सिनेमा क्रमश: १०.४८, ९.५ आणि ८.६२ कोटींची कमाई केली. नवव्या आणि दहाव्या दिवशीही दृश्यम २ चा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरूच आहे. आजच्या दुसऱ्या रविवारीही प्रेक्षकांनी सिनेमाला तुफान प्रतिसाद दिला आहे. आता पर्यंत अजयच्या दृश्यम २ ने १४४.५८ कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा १५० कोटींचा आकडा पार करेल, असे मानले जात आहे.
हेही वाचलंत का?
- BJP chief JP Nadda : समान नागरी कायदा राष्ट्रीय मुद्दा, जास्तीत-जास्त राज्यांमध्ये लागू करावा : जेपी नड्डा
- FIFA WC 2022 : मेस्सीने मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात विश्वविक्रमासह मॅराडोनाच्या विक्रमाशीही केली बरोबरी
- Rane Vs Sushama Andhare : नितू-नीलु हे आपले भाचे अगाव लेकरु; सुषमा अंधारेंचा राणेबंधुवर निशाणा

