माधुरी दीक्षितच्या अदा नाही तर व्हाईट साडीनं लावलं वेड | पुढारी

माधुरी दीक्षितच्या अदा नाही तर व्हाईट साडीनं लावलं वेड

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमी नव्या फॅशनमध्ये आणि ग्लॅमरस लूकमध्ये माधुरी दीक्षितने आपल्या चाहत्यांना वेडं केलं आहे. यावेळी माधुरी दीक्षितच्या अदा नाही तर व्हाईट साडीनं लावलं वेड लावलं आहे. व्हाईट रंगाच्या नेट साडीमध्ये आणि स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये माधुरीने आपले फोटोज शेअर केले आहेत. ब्रॉकेटमध्ये सिल्व्हर रंगाची साडी असलेल्या माधुरीने Finale ready 💎 अशी कॅप्शन लिहिलीय. खरंतर ‘झलक दिखला जा’च्या दहाव्या सीझन फिनालेसाठी माधुरीने जोरदार तयारी केलीय.

लाईट मेकअपमध्ये माधुरी खूप सुंदर दिसतेय. तिने साडीवर कमीत कमी ज्वेलरी घातलीय. तिच्या या फोटोंना 🔥🔥🔥, I love you so much 🥰❤️❤️maam, Love you ma’am ❤️, ❤️❤️❤️❤️, Stunning, Wowwwww, ✨💫, You are a gem 💎💎💎💎💎, ❤️❤️ pearl fect, How can be so beautiful as this😩😩😩, Love this look 😍, 🔥🔥🔥🔥too hot 🥵, Mashallah Beauty with elegance😍😍😍😍😍😍😍😍😍 😘, GEORGEOUS MAM🔥अशा कमेंट्स चाहत्यांनी दिल्या आहेत.

फॅन्सना नेहमी तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. यावेळी धकधक गर्लने व्हाईट साडीत आपली झलक दिखला जा शो च्या तयारीची झलक दाखवली आहे. तिच्या या फोटोवरून नजर हटवता येत नाही. तिचे स्टायलिश ब्लाऊजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री माधुरी एथनिक लूकमध्ये दिसतेय.

माधुरी दीक्षित ‘मजा मा’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात ती एका लेस्बियन महिलेच्या भूमिकेत होती. सध्या माधुरी डान्स रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा १०’ मध्ये परीक्षक म्हणून कार्यरत आहे. या शोमध्ये नोरा फतेही आणि करण जोहरदेखील परीक्षकेच्या भूमिकेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

Back to top button