पौड ते बावीस मैल रस्त्यावर धोकादायक झाडे | पुढारी

पौड ते बावीस मैल रस्त्यावर धोकादायक झाडे

पौड; पुढारी वृत्तसेवा : पौड ते बावीस मैल (ता. मुळशी) यादरम्यान रस्त्याच्या कडेला वाकलेली झाडे धोकादायक झालेली आहेत.
पुणे-दिघी बंदर महामार्गावर पौड-बावीस मैल यादरम्यान हॉटेलजवळ दोन मोठी झाडे गेल्या काही दिवसांपासून धोकादायक स्थितीत आहेत. यातील एक झाड पूर्णपणे वाळलेले आहे. या दोन्ही झाडांच्या फाद्या केव्हाही तुटून रस्त्यावर पडत असतात. हा रस्ता बांधकाम विभागाकडून वर्ग करण्यात आलेला असून, जवळच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे.

तरीही या दोन्ही धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष करीत आहे. रस्त्याचे काम करीत असलेली रोडवेज कंपनीसुध्दा ही झाडे काढण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. झाडे केव्हाही पडू शकतात. सकाळी या बाजूला फिरायला येणार्‍या नागरिकांचे प्रमाण मोठे असून, दिवसभर वाहनांची वर्दळही सतत असते. झाडे पडल्यास मोठा अपघात घडण्याची शकता असून, ही दोन्ही झाडे तोडण्यात यावीत, अशी मागणी पौडचे सरपंच अजय कडू, माजी सरपंच जगदीश लांडगे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार, सामाजिक कार्यकर्ते शांताराम शिर्के यांनी केली आहे.

Back to top button