Kidney Stole of Bihar Woman : महिलेची दोन्ही मूत्रपिंडे गायब; पीडितेचा हट्ट,‘मला हव्यात डॉक्टरच्याच किडन्या’ | पुढारी

Kidney Stole of Bihar Woman : महिलेची दोन्ही मूत्रपिंडे गायब; पीडितेचा हट्ट,‘मला हव्यात डॉक्टरच्याच किडन्या’

पाटणा; पुढारी ऑनलाईन : मुझफ्फरपूर येथील महिला सुनीता देवी यांच्या दोन्ही किडन्या या वर्षी सप्टेंबरमध्ये एका स्थानिक खासगी नर्सिंग होममध्ये फसवणुकीने काढण्यात आल्या. आता ती महिला आपला जीव वाचण्यासाठी संबधित आरोपी डॉक्टराच्या किडनीचे प्रत्यारोपण करा अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. (Kidney Stole of Bihar Woman)

38 वर्षांच्या सुनीता देवी यांच्यावर मुझफ्फरपूर येथील शासकीय श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (SKMCH) उपचार सुरू आहेत. जिवंत राहण्यासाठी त्यांना नियमित डायलिसिसवर ठेवण्यात आले आहे. या महिलेला तीन अल्पवयीन मुले असून त्यांची काळजी घेण्यासाठी तिला जिवंत राहायचे आहे. ही महिला मुझफ्फरपूर शहरातील बरियारपूर भागातील एका खासगी दवाखान्यात तिच्या गर्भाशयाच्या संसर्गावर उपचारासाठी गेली होती. त्याचवेळी डॉक्टरांनी तिच्या दोन्ही किडन्या काढल्याचा आरोप सुनीता देवी यांनी केला आहे. 3 सप्टेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. (Kidney Stole of Bihar Woman)

सुनीता देवी यांनी माध्यमांना सांगितले की,’मी सरकारला आवाहन करते की, ज्या आरोपी डॉक्टरने माझ्या दोन्ही किडनी काढल्या त्याला तात्काळ अटक करण्यात यावी. त्याची किडनी मला प्रत्यारोपणासाठी द्यावी, म्हणजे मी जिवंत राहू शकेन.” अशी कारवाई झाली तर पैशासाठी गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा सर्व लोभी डॉक्टरांना शिक्षा होईल, असे सुनीता देवी म्हणाल्या. तर सप्टेंबर महिन्यात ही घटना उघडकीस आल्यापासून आरोपी डॉ.आर.के. सिंह हा फरार असून त्याच्या ठावठिकाणाबाबत पोलिसांना काहीच सुगावा लागलेला नाही. (Kidney Stole of Bihar Woman)

शस्त्रक्रियेनंतर सुनीता देवी यांची तब्बेत बिघडत गेली. यानंतर त्यांना SKMCH येथे आणण्यात आले. तिथे विविध चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की तुमची दोन्ही मूत्रपिंडे गायब आहेत. यानंतर त्यांना पाटणा येथील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (IGIMS) येथे पाठवण्यात आले. मात्र काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांना पुन्हा एसकेएमसीएचमध्ये पाठवण्यात आले. जिथे ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एसकेएमसीएचचे अधीक्षक डॉ. बी.एस.झा यांनी सांगितले की, महिलेची प्रकृती पाहता प्रत्येक दुसऱ्या दिवशी त्यांचे डायलिसिस केले जात आहे. या महिलेला IGIMS मध्ये सांगण्यात आले की जेव्हा केव्हा किडनी उपलब्ध होईल तेव्हा प्रत्यारोपणासाठी बोलावले जाईल. मात्र, सुनीता यांला स्वतःसाठी किडनी प्रत्यारोपण तातडीने करायचे आहे.


अधिक वाचा :

Back to top button