पुढारी ऑनलाईन डेस्क : गांधी, सरफरोश आणि वास्तव या लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले. शेंडे यांनी मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील राहत्या घरी पहाटे एकच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.१४) दुपारी पारशीवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुनील यांच्या पश्चात पत्नी ज्योती आणि दोन मुले हृषिकेश आणि ओंकार असा परिवार आहे.
सुनील हे घरातच चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला. यामुळेच त्यांचे आज निधन झाले असल्याची माहिती सुनील याच्या सून जुईली शेंडे यांनी दिली आहे. त्याच्या निधनानंतर अनेक स्टार्सनी शोक व्यक्त केला आहे.
सुनील याच्या कार्यकाळात त्यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटातदेखील अभिनयाचा ठसा उमठवला. यात 'सरफरोश', 'गांधी', 'वास्तव', 'निवडुंग', 'मधुचंद्राची रात्र', 'जसा बाप तशी पोर', 'ईश्वर', 'नरसिम्हा' यासारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहे. चित्रपटातील त्याच्या पोलीस ते राजकारणीपर्यत्न अशा अनेक भूमिका आजही चाहत्यांच्या मनात घर करत आहे.
हेही वाचलंत का?