Hansika Motwani: हंसिकाचे लग्न OTT वर लाईव्ह होणार

Hansika Motwani
Hansika Motwani
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी सोहेल कथुरियासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. आता दोघांचे लग्न OTT प्लॅटफॉर्मवरून लाईव्ह स्ट्रीम होणार आहे. हे दोघेही या वर्षी ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. (Hansika Motwani)

डिसेंबरमध्ये लग्न

हंसिका मोटवानीने बिझनेसमन बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत लग्नाची घोषणा केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, लग्न जयपूरमधील ४५० वर्षे जुन्या मुंडोटा किल्ल्यावर होणार आहे. हे दोघेही याच वर्षी ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे. आता, त्यांच्या सेलिब्रिटी लग्नाबद्दल नवीन चर्चा अशी आहे की लग्न OTT प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केले जाईल.

हंसिका मोटवानीच्या या जवळच्या लग्नाला फारच कमी पाहुणे उपस्थित राहतील, ज्यात या जोडप्याचे काही जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य असतील. ३ डिसेंबर ही तारीख मेहंदी आणि संगीत समारंभासाठी निवडण्यात आली आहे, तर २ डिसेंबरला सुफी नाईट असेल. ४ डिसेंबरच्या संध्याकाळी पाहुणे पोलो मॅच आणि कॅसिनो-थीम असलेल्या आफ्टर-पार्टीसाठी उपस्थित राहतील.

लग्नासाठी रोमँटिक प्रस्ताव

हंसिका मोटवानीने तिच्या सोशल मीडियावर सोहेल कथुरियासोबतच्या तिच्या एंगेजमेंट सेरेमनीमधील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. फोटोंमध्ये, सोहेल आयफेल टॉवरसमोर गुडघे टेकून बसलेला दिसतो. टॉवरसमोर गुलाबाच्या पाकळ्या आणि मेणबत्त्यांनी सजवलेल्या हार्ट शेपमध्ये ते उभे दिसत आहेत. त्यांनी पोस्टला Now & Forever ♥️अशी कॅप्शन दिली आहे.

पहिल्या लग्नात गेली होती हंसिका

हंसिका तिचा होणारा पती सोहेल कथूरिया याच्या पहिल्या लग्नात उपस्थित होती. या कपलने २०१६ मध्ये गोवामध्ये एक डेस्टिनेशन वेडिंग लग्न केले होते. तेव्हा हंसिकाने लग्नाला हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

खूप दिवसांची ओळख

हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत आहेत आणि आता ते व्यवसाय भागीदार देखील आहेत. एंगेजमेंटची घोषणा झाल्यापासून चाहते पुढच्या महिन्यात हंसिका मोटवानीच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news