‘दिल दिया गल्‍लां’मध्‍ये कावेरी प्रियमच्या भूमिकेत अमृता

amruta
amruta

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्‍या वैविध्‍यपूर्ण अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रख्‍यात अभिनेत्री कावेरी प्रियम सोनी सबवरील आगामी मालिका 'दिल दिया गल्‍लां'मध्‍ये प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. कावेरी जबाबदार, जिद्दी, हुशार व मोहक तरूणी 'अमृता'ची भूमिका साकारणार आहे. अमृता न्‍यूयॉर्कमध्‍ये लहानची मोठी झाली असली तरी तिने भारतात राहणाऱ्या तिच्‍या आजी-आजोबांसोबत असलेल्‍या दीर्घकालीन गैरसमजामुळे तिच्‍या आई-वडिलांना दु:खात पाहिले आहे. मालिकेमध्‍ये ती महत्त्वाची भूमिका बजावते आणि 'Please mention surname' कुटुंबामध्‍ये नवीन पिढीचे प्रतिनिधीत्‍व करते.

मालिकेमधील आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना कावेरी प्रियम म्‍हणाली, "मला तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्‍व करणारी ही रोमांचक भूमिका साकारण्‍याचा आनंद होत आहे, जी कुटुंबांमध्‍ये नवीन दृष्टिकोण घेऊन येईल. अमृताच्‍या भूमिकेला परिभाषित करणारे गुण म्‍हणजे तिची व्‍यावहारिकता, हुशारी व जबाबदारपणा आणि वास्‍तविक जीवनात ती अगदी माझ्यासारखीच आहे. माझ्या मते, मी अमृतासारखीच उद्देशपूर्वक व वेगळेपणाने स्थिती हाताळते. मी पहिल्‍यांदाच अशा प्रकारची भूमिका साकारणार आहे, जी मॉडर्न असली तरी आपल्‍या संस्‍कृतीशी खोलवर रूजलेली आहे आणि मी यासाठी खूपच उत्‍सुक आहे.''

कावेरीने यापूर्वी अनेक लक्षणीय भूमिका साकारल्‍या आहेत आणि अमृताची भूमिका निश्चितच प्रेक्षकांची मने जिंकेल. या मालिकेमध्‍ये पंकज बेरी देखील महत्त्वाच्‍या भूमिकेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news