Sooraj Barjatya-Salman : सूरज बडजात्या सलमानला घेऊन चित्रपट आणणार? | पुढारी

Sooraj Barjatya-Salman : सूरज बडजात्या सलमानला घेऊन चित्रपट आणणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सूरज बडजात्या बुधवारी मुंबईत त्यांच्या आगामी ‘उंचाई’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित होते. तेथे संध्याकाळी सलमान खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सलमानने सूरज बडजात्या यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आता, ते सलमानला घेऊन नवीन चित्रपट आणताहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सलमान खानला घेऊन सूरज बडजात्या पुन्हा चित्रपट करणार असल्याचे समजते. ते पुन्हा एकत्र येत असल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू आहेत. त्यांनी २०१५ मध्ये प्रेम रतन धन पायो या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते.

Sooraj Barjatya with Salman Khan
Sooraj Barjatya with Salman Khan

उंचाई प्रीमियरच्या वेळी, जेव्हा सलमान खान चित्रपट निर्मात्यासोबत रेड कार्पेटवर गेला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या मीडियाने सूरजला विचारले की, त्यांच्या पुढच्या चित्रपटात सलमानच्या प्रेमची नवी भूमिका असेल का? यावर उत्तर देताना सूरज म्हणाले, “प्रेम परत येईल” आणि ते पुढे म्हणाले, “टायटल रजिस्टर्ड.” त्यानंतर सलमान गंमतीने म्हणाला, “प्रेम परत येईल आणि तोही लग्न करेल याची खात्री आहे त्यांना. त्यांनी चित्रपटाच्या नावाची घोषणादेखील केलीय-प्रेम की शादी.”

सूरज बडजात्या-सलमानचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, सोशल मीडियावर सूरज बडजात्या-सलमान खान यांचा एक व्हिडियो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांचा हात पकडताना दिसत आहेत. त्यांनी अनेक फोटो क्लिकही केले. सूरज – सलमानने एकत्र अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फॅन्स सलमान आणि सूरज बडजात्या यांची जोडी पुन्हा एकत्र येण्याची वाट पाहताहेत.

‘ऊंचाई’ ११ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये अक्षय कुमार, राणी मुखर्जी, काजोल आणि कंगना रानौतसह अन्य बॉलीवूड स्टार्स उपस्थित होते.

Video – viralbhayani insta वरून साभार 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button