बिग बॉस मराठी -४ : टास्कमध्ये होणार तुफान राडा ! | पुढारी

बिग बॉस मराठी -४ : टास्कमध्ये होणार तुफान राडा !

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज टास्कदरम्यान तुफान राडे होणार आहेत. कोण खरं आणि कोण खोटं वागतंय यावरून रुचिरा जरा अशांत झाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं दिसतं आहे की, तेजुला किरण माने सांगत आहेत तिकीट कुठे लपवलं आहे. त्यावरून अक्षय किरण मानेला बजावून सांगताना दिसणार आहेत सांगू नका… चुकीचं आहे.

रुचिरानेदेखील किरण मानेंना जाब विचारला तुम्हाला तेजस्विनीवर विश्वास नाहीये का? तेजस्विनी रुचिराला म्हणाली, आऊट झाली आहे म्हणून रडते. रुचिरा म्हणाली, कोण खरं खेळतं आहे आणि कोण खोटं ते प्रेक्षक ठरवतील. जेव्हा खोटं दिसेल तेव्हा रुचिरा अशांत होणार. तेजस्विनी रुचिराला विचारताना दिसणार आहे. झालं फुटेज घेऊन? पुढे टास्कमध्ये जे झालं हे लवकरचं कळेल.

Back to top button