बिग बॉस मराठी -४ : घरात नवा ग्रुप तयार होणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज यशश्री, रोहित आणि रुचिरा नवा ग्रुप तयार व्हावा यावर चर्चा करताना दिसणार आहेत. यशश्रीचे म्हणणे आहे, मला एक कळत नाहीये जेव्हा सॅम आली होती तुमच्याकडे प्रोपोझल घेऊन कि आपण एक वेगळा ग्रुप तयार करूयात. पण त्याच्या आधीपासून माझ्या डोक्यात होतं ते. मी जेव्हा या ग्रुपमध्ये गेले होते. तेजू, अमृता, तू, मी आणि रोहित असा एक वेगळा ग्रुप असावा त्यात सॅम नव्हती कुठेही. सॅम जरी म्हणत असली ती वैयक्तिक खेळते तरी तिचा कल त्या ग्रुपकडे खूप जास्त आहे आणि ते तिला कधीपण परत खेचून आणू शकतात हे मी पाहिलं आहे.
मला असं वाटतं तुम्हालाही खूप ग्रांटेड घेतलं जातं आणि सगळ्याचबाबतीत की, जेव्हा हवं तेव्हा आपण त्यांना परत खेचून आणू शकतो. रुचिराचे त्यावर म्हणणे आहे, म्हणजे नॉमिनेट करायला आम्ही पाहिजे पण आमची कॅप्टीन्सी, किंवा container शिप गेली तर हे असताना कशी गेली? तिथे त्यांनी ती जपून ठेवली पाहिजे, पण यांना नॉमिनेट करताना आम्ही करू शकतो. आता रुचिराचा नक्की काय मुद्दाच आहे हे कळेलच आजच्या भागामध्ये.
- Ashvini Mahangade : मग नवरा गेल्यानंतर टिकली का लावायची नाही; अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत
- Bebhan Movie :’बेभान’साठी अनुपसिंग ठाकूरला विद्युत जामवालकडून शुभेच्छा
- Leslie Phillips : ‘हॅरी पॉटर’ स्टार लेस्ली फिलिप्स यांचे निधन
