महाराष्ट्राची हास्यजत्रा : मंचावर येणार अभिनेता जितेंद्र जोशी | पुढारी

महाराष्ट्राची हास्यजत्रा : मंचावर येणार अभिनेता जितेंद्र जोशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहिला जातो. हास्यरसिकांना हा कार्यक्रम आठवड्यातले चार दिवस पाहायला मिळतो. नेहमी वेगवेगळे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर उपस्थिती लावतात. आता महाराष्ट्राचा लाडका जितेंद्र जोशी हास्याच्या मंचावर उपस्थिती लावणार आहे. नुसतीच उपस्थिती न लावता चक्क प्रहसन सादर करताना दिसणार आहे, म्हणजेच एका स्कीटमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

गोदावरी या चित्रपटाच्या निमित्ताने जितेंद्र जोशी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे. चक्क समीर चौघुले आणि जितेंद्र जोशी मंचावर एकत्र प्रहसन सादर करताना दिसणार आहे. हा विशेष भाग प्रेक्षकांना गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी पाहायला मिळणार आहे.

Back to top button