जीव माझा गुंतला फेम मल्हारने घेतली विंटेज बाईक | पुढारी

जीव माझा गुंतला फेम मल्हारने घेतली विंटेज बाईक

पुढारी ऑनलाईन : आपण नेहेमीच बघतो बऱ्याच मंडळींना विंटेज गोष्टींचा, वस्तूंचा संग्रह करायची आवड असते मग त्या कार असो, जुने पेंटिंग्स असो वा बाईक असो. असाच छंद ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील मल्हार म्हणेजच आपल्या सगळ्यांचा लाडका सौरभ देखील जोपासत आहे. त्याला विंटेज बाईक्सची खूप आवड आहे आणि त्याचं हे स्वप्न नुकतंच पूर्ण केलं आहे. त्याने सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट देखील शेअर केला आहे.

सौरभने नुकतेच १९६५ म्हणजेच, ५० वर्षांहून जुनी आणि अत्यंत दुर्मिळ अशी बाईक विकत घेतली आहे. त्याने याविषयी आपल्या भावना सांगितल्या आहेत की, ‘मला विंटेज बाईक्सची खूप आवड आहे. या बाईकचं नावं लक्ष्मी आहे. ही ५५ वर्ष जुनी बाईक आहे. हळूहळू या बाईकची निर्मिती बंद करण्यात आली असून त्यामुळे आता हे मॉडेल मिळणे अशक्य आहे. त्यामुळे अतिशय कमी लोकांकडे ही बाईक आहे.

मला लहानपणापासून विंटेज कलेक्शनची खूप आवड आहे. अशी विंटेज बाईक घेणं हे माझं स्वप्न होतं आणि इतक्या वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ते पूर्ण झालं याचा मला आनंद आहे. माझ्याकडे १९६० सालापासूनचे स्टील कॅमेरेदेखील आहेत. लक्ष्मी बाईक सुस्थितीत, भारतात बनवलेली आणि खूपच दुर्मिळ अशी बाईक आता माझ्याकडे आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला लक्ष्मीसारखी विंटेज बाईक मिळाली. किंमत जास्त आहे, पण मला आनंद आहे मला हवी तशी बाईक मिळाली.’ असे म्हटलं आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button