Vir Das: वीर दास आणि नेटफ्लिक्सविरोधात ‘कॉपीराईट’ उल्लंघनाचा आरोप | पुढारी

Vir Das: वीर दास आणि नेटफ्लिक्सविरोधात 'कॉपीराईट' उल्लंघनाचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टँड-अप कॉमेडियन वीर दासच्या अडचणी वाढल्या आहेत. (Vir Das) बंगळुरूनंतर आता मुंबईमध्ये त्याच्या  विरोधात तक्रार दाखल झाली आहे. एका न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी वीर दास, दोन अन्य व्यक्तींना आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सविरोधात कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्याने तक्रार दाखल करुन घेतलीय. (Vir Das)

कोणी केली तक्रार?

प्रसिध्द थिएटर प्रोड्युसर अश्विन गिडवानी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे-ऑक्टोबर २०१० मध्ये त्यांच्या कंपनीने एका शोच्या निर्मितीसाठी वीर दाससोबत करारावर केला होता. पण, जानेवारी, २०२० मध्ये नेटफ्लिक्सवर वीर दासच्या नव्या शोचं प्रोमो पाहिलं, तेव्हा त्यांना असं वाटलं की, शोचे काही कंटेंट त्यांच्या शोशी मिळताजुळता आहे. पोलिसांनी सांगितलं की, याप्रकरणी अद्याप कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

हिंदू जनजागृती समितीने शो रद्द करण्याची केली मागणी

‘हिंदू जनजागृती समिती’ने वीर दास विरोधात बंगळुरु पोलिसांत शो रद्द करण्याची मागणी केली आहे. हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आहे, असे समितीने म्हटले आहे. मागील वर्षी पोलिसांनी दास विरोधात एका व्हिडिओ प्रकरणी तक्रार दाखल केली होती. यानंतर कॉमेडियन वीर दासने एक स्टेटमेंट जारी करत म्हटलं होतं की-त्याची विधाने देशाचे अपमान करण्याच्या उद्देशाने करण्यात आली नव्हती.

हेही वाचा : 

Back to top button