शाब्बास सुनबाई : एका ध्येयवादी सूनेची गोष्ट | पुढारी

शाब्बास सुनबाई : एका ध्येयवादी सूनेची गोष्ट

पुढारी ऑनलाईन : “शाब्बास सुनबाई” ही मालिका कौटुंबिक आणि पारंपरिक प्रथा, विचार व रूढींना वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या सुनेची आहे. या मालिकेतील नायिका “संजीवनी” ही सारासार विचार करणारी ध्येयवादी मुलगी आहे.

लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या संजीवनीला आयुष्यात खूप काही साध्य करायचंय. त्यासाठी तिच्या बाबांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिलंय. तिच्या बाबांनी सतत तिच्या मनावर हेच बिंबवलं आहे की, तिने सतत पहिलं यावं आणि सर्वोत्कृष्ट असावं. तिने तिच्या वडिलांच्या स्वप्नाला आपलसं करत नेहमीच अभ्यासात अव्वल नंबर पटकावत स्वतःचं शैक्षणिक वर्षांत नाव कमावलं आहे.

संजीवनीच्या स्वप्नांना खरा संघर्ष करावा लागणार आहे तो तिच्या लग्नानंतर. कसं आहे तिचं सासर?, संजीवनीला लग्नानंतर नेमका कशाशी आणि कोणाशी संघर्ष करावा लागणार आहे?, प्रवाहाविरुद्ध पोहून आपली स्वप्ने साकारण्यात संजीवनी यशस्वी होणार का? या प्रश्नाभोवती ही मालिका गुंफलेली आहे.

नायिकेच्या भूमिकेत रश्मी अनपट तर खलनायकाच्या भूमिकेत मयूर खांडगे आहेत. मालिकेचे लेखन शार्दुल सराफ व पूर्णानंद वांढेकर यांनी तर मालिकेचं दिग्दर्शन दिनेश घोगळे यांनी केलं आहे. या मालिकेची निर्मिती अभिनेत्री व निर्माती सुचित्रा आदेश बांदेकर यांनी केली आहे. यामुळे या मालिकेसाठी चाहत्यांच्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शाब्बास सुनबाई! ही मालिका १४ नोव्हेंबरपासून सन मराठी या वाहिनीवर सुरू होणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button