'हृदयी प्रीत जागते' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा | पुढारी

'हृदयी प्रीत जागते' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा

पुढारी ऑनलाईन :   मंदार देवस्थळी दिग्दर्शित संगीतमय प्रेमकथा ‘हृदयी प्रीत जागते’ या मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा मालिकेच्या सेटवर खुल्या मैदानात पार पडला.

‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा आहे. ही कथा दोन तरुणांची असून, ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या मालिकेतील नायिका एक प्रामाणिक आणि आज्ञाधारक मुलगी आहे. ती एका नम्र कुटुंबातील आहे.  नायक प्रचंड हुशार, मोहक मुलगा असून त्याला पाश्चिमात्य संगीताची आवड आहे.

हे दोघेही त्यांच्या स्वभावात आणि जीवनशैलीत वेगळे ध्रुव आहेत. पण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहे. नायिका  गायिका आहे. त्यांच्या घरात किर्तनाची परंपरा आहे. तर नायक रॉक बँड परफॉर्मर आहे. ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचेही संगीतावर जीवापाड प्रेम आहे. आता हेच संगीत या दोन आत्म्यांना कसं एकत्र आणते हे बघणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं असणार आहे.

सिद्धार्थ खिरीद आणि पूजा कातुर्डे ही जोडी या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच पंकज विष्णू, राजन भिसे, पौर्णिमा तळवलकर यांसारखे कलाकारही दिसणार आहेत. मालिकेचे लेखन अभिजीत शेंडे यांनी केलं आहे. तर मालिकेची निर्मिती राजेश जोशी यांनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button