Shailesh Lodha Birthday : तारक मेहता फेम शैलेश लोढाबद्दल जाणून घ्या.. | पुढारी

Shailesh Lodha Birthday : तारक मेहता फेम शैलेश लोढाबद्दल जाणून घ्या..

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका चाहत्यांच्या घराघरांत पोहोचली होती. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासोबत मनोरंजन केलं आहे. या मालिकेतील अभिनेता शैलेश लोढा यांनी त्याच्या अभियनासोबत कवितांनी चाहत्यांना मनात घर केलं आहे. तारक मेहता या मालिकेमुळे त्यांना देशातच नव्हे तर परदेशातही एक खास ओळख मिळाली आहे. परंतु, याचदरम्यान मालिकेच्या निर्मात्यांशी त्याचे काही कारणास्तव मतभेद झाले आणि त्यांना या शोतून बाहेर पडावे लागले. अचानक शैलेश लोढा हे मालिकेतून बाहेर पडल्याने चाहत्यांना एक धक्का बसला होता. अभिनेता शैलेश लोढा यांचा आज ८ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असल्याने जाणून घेवूयात त्याच्या संपत्तीविषयी… ( Shailesh Lodha Birthday )

तारक मेहता शोत एन्ट्री

तारक मेहता या शोमध्ये येण्यापूर्वी शैलेश लोढा हे कवी संमेलन भरवत होता. या शोमध्येच त्यांची निर्माता असित मोदी यांची भेट झाली. यादरम्यान असित यांनी शैलेशला तारक मेहता शोमध्ये काम करण्याची ऑफर दिली आणि त्यांनी ती ऑफर स्वीकारली.

Shailesh Lodha Biography: जाने-माने कवि हैं 'तारक मेहता का उल्टा चश्मा' के लीड ऐक्टर शैलेश लोढ़ा, जानें उनके बारे में सब कुछ - taarak mehta ka ooltah chashmah lead actor ...

एका भागासाठी घेतो इतकं मानधन

अभिनेता शैलेश लोढा यांनी तारक मेहता मालिकेत अंजली मेहताच्या पतीची मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या शोत शैलेश आणि वयस्कर जेठालाल यांच्यात घनिष्ठ मैत्री दाखवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शैलेशने तारक मेहताच्या एका एपिसोड (भाग) साठी एक लाख रूपये मानधन घेतले होते. शैलेश लोढा हे अनेक शो आणि मालिकेतून महिन्याला लाखो रुपये मानधन मिळवतात. याशिवाय ते काव्य संमेलनही घेतात.

शैलेश लोढा यांची एकूण ७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात मुंबईत त्याचे घर असून तेथे पत्नी स्वाती आणि मुलगी स्वरासोबत ते राहतात. तारक मेहता शोमध्ये शैलेश लोढा यांनी अगदी सामान्य व्यक्तीची भूमिका साकारली आहे. शैलेश याच्या खऱ्या आयुष्यात महागड्या (लक्झरी) गाड्यांचे शौकीन आहेत. शैलेश लोढा यांच्याकडे सध्या ऑडी, मर्सिडीज, बेंज ई ३५० डी सारख्या अनेक गाड्या आहेत. (Shailesh Lodha Birthday)

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shailesh Lodha (@iamshaileshlodha)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shailesh Lodha (@iamshaileshlodha)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shailesh Lodha (@iamshaileshlodha)

Back to top button