बिग बॉस मराठी -4 : अमृता धोंगडे-अक्षयमध्ये कडाक्याचे भांडणं! | पुढारी

बिग बॉस मराठी -4 : अमृता धोंगडे-अक्षयमध्ये कडाक्याचे भांडणं!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खरंच अमृता धोंगडे आणि अक्षय केळकर मध्ये मेकअप बॉक्स वरून मोठा राडा होणार आहे. बघूया आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं.

अमृता आणि अक्षय मध्ये मेकअप बॉक्सवरून चांगलाच वाद होणार आहे. अमृताने अक्षयला बजावून सांगितले पाय नको मारुस, मेकअप आहे माझा…अक्षय म्हणाला, पाय मुद्दाम मारला का तुझ्या मेकअपला ? अमृता म्हणाली, मी सांगून देखील पाय अजून तिथेच आहे तुझा? अक्षयचे यावर म्हणणे आहे मी मुद्दाम मारला का? पाय मारला हे वाक्य म्हणू नकोस …

अमृता म्हणाली, मग काय म्हणू ? दुसरं वाक्य काय आहे ? अक्षय म्हणाला, पाय लागला असं म्हण… तुझ्यासारखा मूर्ख आहे का मी? चिटर कुठली रडी… आणि हे भांडणं असच सुरू राहिले… अमृता म्हणाली, तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. अक्षय म्हणाला, तेच म्हणणं आहे खूप फरक आहे आपल्यात म्हणूनच तुझ्याशी वाद नाही घालत आहे.

बघूया अजून काय झालं घरात कोणत्या चर्चा रंगल्या आणि कोणामध्ये झाला वाद आजच्या भागात.

Back to top button