HBD Aishwarya Rai : ऐश्वर्याकडे आहेत 'या' महागड्या वस्तू | पुढारी

HBD Aishwarya Rai : ऐश्वर्याकडे आहेत 'या' महागड्या वस्तू

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज ऐश्वर्या राय बच्चनचा वाढदिवस आहे. (HBD Aishwarya Rai) नुकतीच ही अभिनेत्री पोन्नियिन सेल्वन या चित्रपटात दिसली होती. ऐश्वर्याने अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ४९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. पण, तिच्याकडे पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की, ती खरंच पन्नाशी गाठतेय! तिचं सौंदर्य या वयातही अबाधित आहे. त्यामुळे तिची लाईफस्टाईल जाणून घ्यायला सर्वांनाच आवडेल. ती लक्झरी लाईफ जगते आणि तिच्याकडे अनेक महागड्या वस्तू आहेत, ज्याची किंमत कोटींमध्ये आहे. (HBD Aishwarya Rai)

बच्चन कुटुंबाच्या या सुनेने आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावले आहे, तर दुसरीकडे तिने अभिनयातही आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. तुम्हाला माहितीये का तिच्याकडे कोणत्या महागड्या वस्तू आहेत आणि तिची संपत्ती किती आहे?

ऐश्वर्या रायची निव्वळ संपत्ती

ऐश्वर्या राय बच्चनची लाइफस्टाईल बरीच लक्झरी आहे. तिच्या संपत्ती बद्दल बोलायचे झाल्यास, मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची संपत्ती सुमारे २२७ कोटी रुपये आहे.

आलिशान घर

ऐश्वर्या राय बच्चन अनेक महागड्या वस्तूंची मालक आहे. दुबईतील जुमेराह गोल्फ इस्टेटच्या अभयारण्य फॉल्समध्ये त्यांचे एक आलिशान घर आहे. ज्याची किंमत १५.६ कोटी रुपये आहे. याशिवाय अभिनेत्रीचे मुंबईतील वांद्रे येथे एक भव्य अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत २१ कोटी रुपये असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

महागड्या गाड्या

ऐश्वर्या राय बच्चनला महागड्या कारची आवड आहे. तिच्याकडे अशा अनेक गाड्या आहेत, ज्याची किंमत जाणून तुम्ही थक्क व्हाल. तिच्याकडे ‘Rolls-Royce Ghost’, ‘Mercedes-Benz S-350D’, ‘Lexus LX vs Audi A8 L’ आणि ‘मर्सिडीज- बेंज S500 आहे.’ याशिवाय, अॅश बेंटले कॉन्टिनेंटल जीटीदेखील आहे, त्याची किंमत ३.६५ कोटी रुपये आहे.

ऐश्वर्या रायने २००७ मध्ये अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. तिने लग्नात घातलेली साडी डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाईन केली होती. त्याची किंमत ७५ लाख रुपये होती. याशिवाय अभिषेकने तिला 53 कॅरेटची हिऱ्याची अंगठी भेट दिली. त्याची किंमत ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले होते.

Back to top button