Priyanka Chopra : तब्बल तीन वर्षांनी प्रियांका बाळासह भारतात परतणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने आपल्या हरहुन्नरी अभिनयाने बॉलिवूडसह हॉलिवूड चित्रपटातही आपली एक वेगळी क्रेझ तयार केली आहे. प्रियांकाने (Priyanka Chopra) भारतातच नाही तर परदेशातही अपार यश मिळवलं आहे. ग्लोबल आयकॉन बनलेली प्रियांका कधी आपल्या चित्रपटांमुळे तर कधी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत नेहमीच चर्चेत असते. (Priyanka Chopra)
प्रियांका आपला पती निक व मुलगी मालतीसह परदेशात राहत आहे. ती आपल्या कुंटुंबात रमून गेली आहे. प्रियांकाने भारतात परत यावे, असे अनेक चाहत्यांचे मत होते. आता तिच्या चाहत्यांशी इच्छा पूर्ण होणार आहे. देसी गर्ल पुन्हा भारतात परतणार आहे.
परदेशातून जवळपास तीन वर्षांनी आपल्या मुलीसोबत प्रियांका परत भारतात येत आहे. अशी माहिती स्वत: अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अधिकृत इंन्स्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. तसेच तिने यूएसए-मुंबई फ्लाईटच्या बोर्डिंग पासचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कॅप्शनसह पोस्ट केला आहे. ही माहिती शेअर करताना ती भावूक झाली आहे. अनेक वर्षे परदेशात वास्तव केल्यानंतर परत आपल्या मायदेशी परतण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. तब्बल तीन वर्षांनी भारतात परत येत असल्याने प्रियांका चोप्राचा चेहरा आनंदाने खुलला आहे.
‘शेवटी … घरी जात आहे. तेही जवळपास 3 वर्षांनी माझ्यासोबत माझी लाडकी राजकुमारी मालतीही माझ्यासोबत आहे. तुम्हाला सांगायचे म्हणजे मालती पहिल्यांदाच भारतात येत आहे, अशी कॅप्शन देत प्रियांकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर बोर्डिंग पासचा फोटो शेअर केला आहे.
हेही वाचलंत का ?
- Rishab Shetty: ‘कांतारा’च्या यशानंतर ऋषभ शेट्टीने घेतले सिद्धिविनायक दर्शन
- आर्यन खान पुन्हा चर्चेत
- Movie Release : खुशखबर; नोव्हेंबरमध्ये तब्बल २३ चित्रपट पडद्यावर
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram