आता A फॉर Arjun, B फॉर Balram!, युपीतील वकिलाने तयार केली नवीन वर्णमाला | पुढारी

आता A फॉर Arjun, B फॉर Balram!, युपीतील वकिलाने तयार केली नवीन वर्णमाला

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामान्यतः मुले इंग्रजी अक्षरात A फॉर अॅपल आणि B फॉर बॉय वाचत असतात. परंतु आता मुले A फॉर अर्जुन आणि B फॉर बलराम असे वाचताना दिसू शकतात. शिक्षकांच्या सोशल मीडिया ग्रुपवर अशाच इंग्रजी अक्षरांची वर्णमाला मोठ्या प्रमाणात प्रसारीत केली जात आहेत. यामध्ये इंग्रजीतील A ते Z पर्यंतच्या अक्षरांना भारतीय पौराणिक संस्कृती आणि इतिहासातील लागू होणारी अक्षरे घेतली जात आहेत.

हिंदी भाषेत सुद्धा तयार होत आहे शब्दसंग्रह…

इंग्रजी अक्षराशी संबंधित असा शब्दसंग्रह सीतापूर येथील एका वकिलाने तयार केला आहे. अमीनाबाद इंटर कॉलेजचे प्राचार्य एस.एल. मिश्रा यांनी सांगितले की, एका वकिलाने भारतीय पौराणिक संस्कृती आणि इतिहास यांची सांगड घालून अशी वर्णमाला तयार केली आहे. परंतु ते याबद्दल मीडियासमोर येऊ इच्छित नाहीत. मात्र, प्रकाशकांनाही ही नवीन संकल्पना आवडू लागली आहे. मेरठच्या एका प्रकाशकाने ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये अक्षरांशी संबंधित वर्णने दुरुस्त करून तपशीलवार लिहिली जातील, जेणेकरून मुलांना थोडी अधिक माहिती मिळेल. एस.एल. मिश्रा म्हणाले की, ज्या वकिलांनी ही वर्णमाला तयार केली आहे ते हिंदी वर्णमालेचा शब्दसंग्रहही तयार करत आहेत.

इंग्रजी अक्षरांची वर्णमाला पुढील प्रमाणे आहे…

A for अर्जुन (Arjun), B for बलराम (Balram), C for चाणक्य (Chanakya), D for ध्रुव (Dhruv), E for एकलव्य (Eklavya), F for फोर वेद (Four Vedas), G for गायत्री माता (Gayatri Mata), H for हनुमान (Hanuman), I for इंद्र (Indra), J for जटायु (Jatayu), K for कृष्ण (Krishna), L for लव-कुश (Lav Kush), M for मार्कंडेय (Markandeya), N for नारद (Narad), O for ओमकार (Omkar), P for प्रल्हाद (Pralhad), Q for क्वीन गांधारी (Queen Gandhari), R for राम (Ram), S for सूर्य (Surya), T for तुलसी (Tulasi), U for उद्धव (Uddhav), V for वामनावतार (Vamana Avatar), W for वॉटर गंगा (Water Ganga), X for क्षीरब्दी द्वादशी (Xsheerabdhi dwadashi), Y for यशोदा (Yashodha), Z for जामवंत (Zamvant)

दरम्यान, कांची कामकोटी पीठाने हा विषयाचा अभ्यासक्रम यापूर्वीच तयार केला आहे. शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी कांचीपुरम येथील पीठ कडून याची माहिती देण्यात आली होती. त्याविषयीचे वृत्तही काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. मुलांना त्यांच्या संस्कृतीची जाणीव करून देणे हा नवीन अभ्यासक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले होते. पीठाने भारतातील नद्यांची नावे, रामायण, महाभारत आणि वेदांचा नव्या वर्णमालेमध्ये समावेश केला आहे. ही पुस्तके नीता प्रकाशन दिल्ली आणि कांची कामकोटी पीठ यांनी प्रकाशित केली आहेत. पीठाच्या शाळांसह दक्षिण भारतातील अनेक शाळांमध्ये हे शिकवले जात आहे.

Back to top button